नारायण राणेंविरोधातला 16 वर्षापूर्वीचा ऍट्रॉसिटीचा गुन्हा रद्द 

बाळ नांदगावकर रविंद्र शेंडगेनाही हायकोर्टाचा दिलासा 
मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तत्कालीन आमदार पद्माकर वळवी यांना 16 वर्षापूर्वी डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यासह मनसे नेते बाळ नांदगांवकर आणि रविंद्र शेंडगे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिला. न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेला हा खटला अखेर रद्द केला.
राष्टवादी कॉंग्रेसचे तत्कालीन आमदार पद्माकर वळवी 2002 साली मुंबईत आले होते. त्यावेळी राणे यांनी मातोश्री स्पोर्ट क्‍लब येथे वळवी यांना बोलावले व कॉंग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. वळवी यांनी त्याला विरोध करत तेथून निसटायचा प्रयत्न केला. मात्र तेथे उपस्थित असलेल्या बॉडीगार्डने वळवी यांना अडविले व डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी वळवी तेथून रिक्षाने निसटले परंतू राणेंच्या माणसांनी त्यांना हिरानंदानी गार्डन जवळ गाठले आणि पुन्हा घेऊन आले.
वळवी यांनी कशीबशी आपली सुटका करुन घेतली होती. त्यांनी याप्रकरणी 27 जुलै 2002 रोजी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले असून याप्रकरणी दंडाधिकारी तसेच सत्र न्यायालयात खटले सुरु आहेत.
त्याचबरोबर पोलीसांनीही 2003 साली राणे यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र रद्द करण्या बरोबरच खटला रद्द करावा अशी विनंती करणारी याचिका नारायण राणे, बाळ नांदगावकर रवद्रि शेंडगे यांच्यावतीने.उच्च न्यायालयात दाखल केली होती .
या याचिकेवर झालेल्या सुनावणीच्यावेळी बाळ नांदगांवकर आणि रविंद्र शेंडगे यांच्या विरोधात ऍट्रॅसिटी ऍक्‍ट अंतर्गत गुन्हाच दाखल होऊ शकत नाही तर नारायण राणे यांच्या विरोधा एसीपी दर्जाच्या तपास अधिकाऱ्यांने तपास करणे बंधनकारक होते. परंतू तसा तपास केला गेला नाही याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तर राष्ट्रवादीचे तात्कालीन आमदार पद्माकर वळवी यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून गुन्हा रद्द करण्यास आपली हरकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. याची दखल घेऊन न्यायालयाने खटलाच
रद्द केला.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)