नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत अशोक चव्हाण यांचे मौन

राष्ट्रवादी कॉंग्रेसवर आम्ही अवलंबून नाही

पंढरपूर – कॉंग्रेस नेते नारायण राणे यांचा भाजप प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हतबल झालेले दिसून आले, याबाबत राणेंना विचारा म्हणत त्यांनी बोलण टाळले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण एका कार्यक्रमासाठी पंढरपुरात आले होते श्री विठ्ठल रूक्‍मिणी दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राणे यांच्या प्रवेशाची चर्चा हा कॉंग्रेस नेत्यांना डोकेदुखीचा विषय झाला आहे. ते आपले आहेत असेही कॉंग्रेस नेते धाडसाने सांगू शकत नाहीत. खुद्द कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षच नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत हतबल झाले असून त्याच त्यांना विचारा, म्हणत यावर उत्तर देणे टाळले.

राज्यात आर्थिक नियोजनाचा अभाव असून सरकारी जागा विकण्याची गरज नाही. स्वतःचे स्रोत करण्याची क्षमता सरकारकडे आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू नये, हाच सरकारचा डाव आहे. 34 हजार कोटीची कर्जमाफी झालेली नाही. बोलण्यापुरताचा हा विषय असल्याच चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.

विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस सक्षम आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसवर आम्ही अवलंबून नाही. असे सांगत कोणतही सरकार विरोधी आंदोलनात कॉंग्रेस एकटी लढायला तयार असल्याचे ते म्हणाले. आगामी काळात काय घडेल याचे संकेतच चव्हाण यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)