नारायणपूरला रंगला गुरुनानक जयंती सोहळा

सासवड- दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष, मंदिरात केलेली विविध रंगांच्या फुलांची सजावट, हातामध्ये भगव्या पताका, टाळ- मृदुंगाचा गजर आणि फुलांची उधळण करीत मोठ्या उत्साहात गुरुनानक जयंती साजरी करण्यात आली.
क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथील दत्त मंदिरात श्री गुरुनानक महाराज यांच्या प्रतिमेची फुलांच्या माध्यमातून सजावट करण्यात आली होती. हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी दिवसभर मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात नानकजी, नानकजी जय गुरु देव, नानकजीचा जयघोष सुरु होता.
पहाटे 3 वाजता मंदिरात देवांना स्नान घालण्यात आले. त्यानंतर 4 वाजता कापुर आरती, काकड आरती, होम हवनाचा कार्यक्रम झाला. सेवेकरी मंडळाच्या वतीने सामुहिक भजनाचा कार्यक्रम झाला. दत्त मंदिराचे नारायण महाराज यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन गुरुनानक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात टाळ मृदुंगाचा गजर करीत भजन करण्यात आले. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी गुरुदेव दत्तचा जयघोष करीत पुष्पवृष्टी केली आणि संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हावून निघाला. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. रात्री मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमानिमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसरात हजारो पणत्या लावल्याने संपूर्ण परिसर रोषणाईने चमकत होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)