नारायणपुरातील स्मशानभूमी जोड रस्त्याचे भूमिपूजन

काळदरी – पुरंदर तालुक्‍यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी जोड रस्ता नसल्याने ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात मोठ्या गैरसोयीचा सामना करावा होता. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता व्हावा, अशी ग्रामस्थांनी मागणी केली होती. याचीच दखल घेऊन पंचायत समिती सदस्या नलिनी लोळे यांच्या माध्यमातूनत स्मशानभूमी जोड रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले. राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रेरणेतून व जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांच्या सहकार्याने भिवडी गणाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे नलिनी लोळे यांनी सांगितले.
या कामाचे भूमिपूजन लोळे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. नारायणपूर गावाकरिता स्मशानभूमीचे पक्के बांधकाम झाल्याने विधी मार्ग करणे सोयीचे झाले होते. मात्र स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता कच्चा असल्याने गावकरी त्रस्त झाले होते. मात्र आता स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होऊन कामास सुरुवात होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी नारायणपूरच्या सरपंच ज्योती बडधे, पानवडीचे माजी सरपंच हरिभाऊ लोळे, शिवसेना गणप्रमुख सदानंद बोरकर, ग्रामसेवक महेश म्हेत्रे, काका बोरकर, सोपान बोरकर, आण्णा डांगे, विपुल बोरकर, प्रशांत बोरकर, भिमसेन बोरकर, तुषार बोरकर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)