नारायणगाव वाहतूक जनजागृती कार्यक्रम

नारायणगाव- लायन्स क्‍लब ऑफ जुन्नर शिवनेरी व बांगा टायर्स यांच्या संयुक्‍त विद्यमाने नारायणगाव येथे वाहतूक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लायन्सचे अध्यक्ष शिरीष जठार व लिओ लायन यांच्या हस्ते पाहुण्यांचे तसेच पोलीस मित्रांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर नागरिकांनी नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले तर वाहतुकीची नियमावलीबाबत पत्रके वाटप करण्यात आले. या अभियानाला नागरिकांनी व प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमास सचिव जितेंद्र गुंजाळ, योगेश जुन्नरकर, योगेश रायकर, दिलदी बांगा, अजय चोरडिया, विवेक मुळे, संपत शिंदे, सचिन जंगम, रंगनाथ गोल्हार, नरेंद्र गोसावी, मनोज भगत उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)