नारायणगाव पोलिसांची बेशिस्त 35 वाहनचालकांवर कारवाई

7 हजार रूपयांचा दंड वसूल : सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर खटले भरणार

नारायणगाव: येथील पुणे-नाशिक महामार्ग, मुख्य बाजारपेठ-जुन्नर रस्ता आणि खोडद रोडवर बेशिस्त पार्किंग करणाऱ्या बुधवारी (दि.29) 35 वाहनांवर नारायणगाव पोलिसांनी 7 हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई सुरूच राहणार असून रस्त्यांवर विविध वस्तू, फळे विक्री करणारे गाळाधारक, हातगाडीवाले, खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या जीप, रिक्षा, टेम्पो आदींनी वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये, अशा सूचना दिलेल्या आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्यावर खटले भरले जातील, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी मंगळवारी (दि. 28) वाहतूक समस्या आणि त्यावरील उपाययोजना याविषयी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत व्यापारी, पदाधिकारी, एसटी डेपो अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, जिप चालक मालक, फळ विक्रेते, हातगाडीवाले, गाळेधारक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

खोडद रोडवर 12 वाहने, पुणे- नाशिक महामार्गावर 12 आणि जुन्नर रोडवर 11 जणांवर कारवाई केली. बुधवारी सकाळपासून अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे, राहुल गोंधे, पोलीस वाहतूक नियंत्रक शामसुंदर जायभाये, सचिन कोबल, होमगार्ड गणेश बेल्हेकर यांनी जॅमर लावून दंडात्मक कारवाईची सुरुवात केली आहे. पोलीस जीपमध्ये माईकवर सूचना देण्यात येत असून या सूचनेचे पालन न करणाऱ्यांवर खटले दाखल करण्यास सुरुवात केली जाणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)