नारायणगाव पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी

निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर यंत्रणा सतर्क

नारायणगाव- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता काळात पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. कुठलीही अघटित घटना घडू नये याकरिता दिवस व रात्री नाकाबंदी लावून सर्वच वाहनांची तपासणी कसून केली जात असल्याचे नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या माध्यमातून सध्या आचार संहिता चालू असून याचा भंग होऊ नये याकरिता पोलीस सतर्क आहेत. दिवसा व रात्री या दोन्ही सत्रात नाकाबंदी लावून सर्वच गाड्यांची तपासणी केली जात आहे. मतदारांना अतिरिक्त पैसे, मद्य तसेच शस्त्र वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता वाहन तपासणीसह चालकाचे ओळखपत्र, गाडी परवाना आदींची विचारपूस केली जात आहे. प्रवासी वाहन चालकांनी तसेच नागरिकांनी प्रवास करतेवेळी आपल्या गाडीत कोणी बेकायदा वस्तू घेऊन प्रवास करीत नाही ना? अथवा बरोबर प्रवास करणारी व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत नाही ना? याची खातरजमा करावी. काही संशयास्पदर वाटल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन घोडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)