नारायणगाव परिसरात तीन दारू भट्ट्या उद्‌ध्वस्त

1 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नारायणगाव- लोकसभा 2019 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबवून तीन दारू भट्ट्यांसह अवैध दारू धंद्यांवर 10 ठिकाणी कार्यवाही केली. यात देशी-विदेशी कंपनीची दारू, गावठी दारू व त्यासाठी लागणारे रसायन असा 1 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
संगीता बाळू गुळवे (वय 36), किशोर पोपट माचरेकर (दोघे रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर), मिनाबाई रामसिंग रजपुत (रा. 14 नंबर, ता. जुन्नर),(रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर), स्वप्निल सुखदेव घोडे (रा. निमगाव सावा, ता. जुन्नर), दिलीप सावळाराम चव्हाण (रा. पारगाव, ता. जुन्नर), शशिकला ज्ञानेश्‍वर गायकवाड (रा. खोडद, ता. जुन्नर), दिपेश बुठा क्षेत्री (वय 29), निलेश विजय मारवाडी, बेबी युवराज बिनावत, राणी दिलीप बिरे (चौघे रा. धनगरवाडी, ता. जुन्नर) या दहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
नारायणगाव पोलीस परिक्षेत्रात अवैद्य दारू धंदे वाढले असल्याची तक्रारी वाढल्या होत्या आचार संहिता सुरू असून निवडणूक काळात शांतता राहावी ह्या दृष्टिकोनातून नारायणगाव पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचे घोडे पाटील यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधिक्षक संदीप जाधव, पोलीस उपअधीक्षक दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे, सहायक फौजदार शिवाजी केंगले, डी. बी. गभाले, आर. बी. शिंदे, भीमा लोंढे, दिनेश साबळे, सचिन कोबल, स्वप्नील लोहार, नवीन अरगडे, शैलेश वाघमारे, प्रिया लोंढे, शुभांगी दरवडे, रंजना मेचकर या पथकाने केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)