नारायणगावात 86 एसटी आगाराच उभ्या

नारायणगाव- सकल मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी बंदला नारायणगाव व वारूळवाडी शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. तर सुरक्षेच्या कारण्यास्तवर नारायणगाव एसटी आगारातील सर्व 86 एसटी बसेस आगारातच उभ्या होत्या त्यामुळे रोज होणाऱ्या 750 फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या त्यामुळे आगाराला सात लाखांचे आर्थिक नुकसान झाले, अशी माहिती एसटी आगारातील वाहतूक नियंत्रक महेश विटे यांनी दिली.
शहरातील सर्व व्यवहार व दुकाने बंद असल्याने शहरात शांतता होती. पोलिसांनी बंद काळात शांतता राहून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील सर्व इंटरनेट सेवा सकाळी 8 ते सायंकाळ पर्यंत बंद ठेवली होती. शहरातील व्यावसायिक दुकाने, हॉटेल्स, शासकीय कार्यालये, हातगाड्या, टपऱ्या, खासगी वाहतूक, सरकारी बॅंका परिसरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूकसेवा बंद असल्याने महामार्गावर शांतता होती. बंद काळात काही मेडिकल, हॉस्पिटल या अत्यावश्‍यक सेवा सुरु होत्या.

  • पोलिसांचा फौजफाटा
    नारायणगवात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली 4 पोलीस अधिकारी, 60 कर्मचारी, शीघ्र पोलीस पथकाचे कर्मचारी बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)