नारायणगावात सायकल स्पर्धेत 340 स्पर्धकांचा सहभाग

नारायणगाव – लायन्स क्‍बल ऑफ शिवनेरी आणि ग्रामोन्नती मंडळ, नारायणगाव आयोजित सायकल स्पर्धेमध्ये 350 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मोठ्या गटात विवेक वायकर, लहान गटात ओंकार सोलाट, तर मुलींच्या लहान गटात अक्षदा डोंगरे यांनी प्रथम क्रमांक पटकविला, अशी माहिती लायन्स क्‍बलचे अध्यक्ष शिरीष जठार व सेक्रेटरी जितेंद्र गुंजाळ यांनी दिली.
या स्पर्धेचे उद्‌घाटन ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, नरेंद्र भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरणावेळी आमदार शरद सोनवणे, सरपंच योगेश पाटे, उपसरपंच संतोष दांगट, विजय सरडा, प्रकाश सुतरावे, मुख्याध्यापक एच. पी. नरसुडे, घोलप आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे नियोजन लायन्स अध्यक्ष शिरीष जठार, योगेश जुन्नरकर, अजित वाजगे, रंगनाथ गोल्हार, प्रसाद जठार, अभय वाव्हळ यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित वाजगे, अभय वाव्हळ यांनी केले, तर जितेंद्र गुंजाळ यांनी आभार मानले.

विजयी स्पर्धक गटानुसार पुढील प्रमाणे –
मोठा गट – मुले – विवेक वायकर (प्रथम), संग्राम गुळवे (द्वितीय), मुकेश सिंग (तृतीय), अभिषेक थोरात (चतुर्थ), मयुर चव्हाण (पाचवा).
लहान गट – मुले – ओंकार सोलाट (प्रथम), कौशल गाळव (द्वितीय), आझाद तोडकर (तृतीय), अभिषेक गाळव (चतुर्थ), आर्यन गाढवे (पाचवा).
मुलींचा गट – अक्षदा डोंगरे (प्रथम), क्रांती डुंबरे (द्वितीय), तुजा भोर (तृतीय), कावेरी मनसुख (चतुर्थ), सलोनी कवडे (पाचवा).

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)