नारायणगावात साकारणार भव्य सार्वजनिक वाचनालय

स्व. गुलाबराव डेरे सार्वजनिक वाचनालयाचा होणार कालापालट

नारायणगाव- धर्मवीर सभाजी पतसंस्थेचे अध्यक्ष स्व. गुलाबराव डेरेपाटील यांचे कार्य नारायणगावकरांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभी राहाणारी वाचनालयाची इमारत खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचे स्मारक असणार आहे. इमारतीचे काम भव्य करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे सरपंच योगेश पाटे यांनी सांगितले.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथे धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे संस्थापक स्वर्गीय गुलाबराव डेरे पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त धर्मवीर संभाजी पतसंस्था, हनुमान चौक मित्रमंडळ आणि ग्रामपंचायत नारायणगाव यांचे वतीन शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्या खासदार निधीतूून 10 लाख रुपयांतून स्वर्गीय गुलाबराव डेरे पाटील सर्वजनिक वाचनालय इमारतीचा भूमीपूजन समारंभ शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी सरपंच योगेश पाटे बोलत होते.
यावेळी पतसंस्था अध्यक्ष वसंतराव देशमुख, उपसरपंच संतोष, जि. प. पुणे च्या गटनेत्या आशा बुचके, पं. स. सदस्या अर्चना माळवदकर, गटनेते दिलीप गांजाळे, “विघ्नहर’चे संचालक संतोष खैरे, सरपंच योगेश (बाबु) पाटे, उपसरपंच संतोष दांगट, माजी उपसरपंच आशिष माळवदकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश पाटे, धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, महिला आघाडी प्रमुख रुपाली शिंदे, जयेश कोकणे, डॉ. शिवदास तांबे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत धर्मवीर संभाजी पतसंस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन मेहबुब काझी आणि ज्ञानेश्वर औटी यांनी केले तर आभार संचालक राजेश कोल्हे यांनी मानले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)