नारायणगावात श्रीराम जन्मोत्सव

नारायणगाव-श्रीराम नवमीनिमित्त नारायणगाव ब्राह्मण संघाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती संघाचे अध्यक्ष एकनाथ कुलकर्णी व निरंजन जोगळेकर यांनी दिली. श्रीराम नवमीनिमित्त सकाळी 9 वा नारायणगाव शहरातून श्रीराम पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 10 वाजता श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम व हभप महेश देशपांडे यांचे कीर्तन झाले. नारायणगाव ब्राह्मण संघाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव निमित्त 18 मार्च ते 25 मार्चपर्यंत अरविंद भेट यांचे गीत रामायण, ऍड. अर्पण तीर्थकर यांचे कुटुंबातील नाते संबंध, हेमा मुरुडकर यांचे भावस्पर्शी कथाकथन, प्रभाकर निलेगावकर यांचे अस्सल माणसे -इरसाल नमूने, श्रीकृष्ण देशमुख यांचे स्पॉट बॉय आदी विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम व व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. यावेळी प्रिया कामात, हरिओम ब्रम्हे, हेमंत महाजन, संतोष देशपांडे, मंगलकुमार चिंतामणी, नीलिमा जोशी, प्रतिभा पाथरकर, दीपक कुलकर्णी, गणेश देशपांडे, पुष्कर ब्रम्हे आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)