नारायणगावात शटर उचकटून चोरी

चोरटा सीसीटीव्हीत कैद ः रोख रकमेसह ऐवज चोरला

नारायणगाव-नारायणगावातील खोडद रोड येथील दोन दुकाने व एक वर्कशॉपचे शटर उचकटून सुमारे 21 हजार रुपये किमतीची रोख रक्कम व वर्क शॉपमधील टूल किट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री दोन वाजता घडली, अशी माहिती राजेंद्र खिलारी व सुजित वाजगे यांनी दिली.
खोडद रोडवरील रामकृष्ण चौकात राजेंद्र खिलारी यांच्या मालकीचे ओम साई ट्रेडर्स या दुकानाचे मध्यरात्री दोनच्या सुमारास शटर उचकटून दुकानातील 15 हजार रुपयांची चिल्लर, बिस्कीट, चॉकलेट असे खाण्याचे पदार्थ चोरून नेले. शेजारील वेल इंटरप्रायजेसचे शटर उचकटून दुकानातील 1 हजार 500 रुपयांची चिल्लर, खाण्याचे पदार्थ चोरून नेले. तसेच त्या दरम्यान समोरील सुजित लक्ष्मण वाजगे यांच्या हिरो शोरूममधील वर्क शॉपचे शटर उचकटून 32 इंची टीव्ही, 4 हजार रुपये किमतीचे टूल किट, चिल्लर चोरट्यांनी नेली. यावेळी बाहेर गावाहून घरी जात असताना खोडद रोडवरील रहिवासी उद्योजक वैभव मुथ्था यांना अडीच वाजता रामकृष्ण चौकात राजेंद्र खिलारी यांच्या मालकीचे ओम साई ट्रेडर्स दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. त्यांनी तात्काळ नारायणगाव पोलीस ठाण्यात संपर्क करून घटनेची माहिती दिली. पोलीस उप निरीक्षक राहुल गोंधे यांनी येऊन पाहणी केली. हद्दीतील सर्व पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांना त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. त्यामध्ये दोन अज्ञात 25 ते 30 वयोगटातील चोरटे निष्पन्न झाले आहेत. या पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)