नारायणगावात महावीर स्वामींच्या प्रतिमेची मिरवणूक

नारायणगाव- भगवान महावीर स्वामींच्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त नारायणगाव येथील जैन स्थानकवासी श्रावक संघ आणि जैन सोशल क्‍लब यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव येथील भगवान महावीर भवन येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती जैन स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष राजेंद्र बोरा आणि जैन सोशल क्‍लबचे अध्यक्ष स्वप्नील भन्साळी यांनी दिली.
भगवान महावीर स्वामींच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त जैन धर्मीय बंधू-भगिनींनी नारायणगाव शहारातून घोषणा देत भगवान महावीर प्रतिमेची मिरवणूक काढली. या मिरवणूक जैन बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जैन मंदिरात जाऊन सर्व बंधू-भगिनींनी भगवान महावीरांचे दर्शन घेतले.
यावेळी शिंदे मार्केट येथे जैन सोशल क्‍लब व शिंदे परिवार यांचे वतीने सुरू करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्‌घाटन नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच महावीर जयंती निमित्त रक्‍तदान शिबिरात 60 रक्‍तदात्यांनी रक्‍तदान केले. या रक्‍तदान शिबिरात महिलांनीही रक्‍तदान केले. या कार्यक्रमास उपस्थित असलेले आमदार शरद सोनवणे यांनी देखील रक्‍तदान केले. महावीर भवन येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये भगवान महावीर स्वामी जन्म वाचन अभय चोरडीया यांनी केले. आनंद नवकार पाठशाळेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार शरद सोनवणे म्हणाले की, जैन धर्मीय बांधव हे अहिंसेचे पूजक आहे. भगवान महावीर यांचा अहिंसेचा संदेश लोक कल्याणासाठी दिशा देणारा ठरला आहे. सर्व मिरवणुकींना पोलीस बंदोबस्त लागतो; परंतु एकमेव जैन समाजातील मिरवणुकीला पोलीस बंदोबस्ताची गरज नसते.
भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन बांधवांना आयोजित कार्यक्रमास जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके, युवा नेते अतुल बेनके, शिवसेनेचे माऊली खंडागळे, सुफी संत लतिफभाई पटेल यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी तात्यासाहेब गुंजाळ, म.पा. काजळे, सरपंच योगेश पाटे, मकरंद पाटे, संतोष खैरे, रोहिदास केदारी, तेजाभाई पटेल, अनिल खैरे, विकास तोडकरी, आरीफ आतार, वारूळवाडीचे उपसरपंच परशुराम वारूळे, संतोष वाजगे, खुशाल बडेरा, अशोक गांधी, देवीचंद कटारीया, आषिश कोठारी, महेंद्र चोरडीया, मनोज भळगट, अशोक खिवंसरा, संतोश पोखरणा, संदीप मुथ्था, राजेंद्र लोढा, गिरीश मुनोत, चंद्रभान कोठारी, सुभाश संकलेचा, सुभाष कांकरिया, जयंतीलाल सुराणा, अरूण मुथ्था, सचिन शेलोत, सुरेश कोठारी, शीतल पटवा, प्रितेश खिवंसरा, वैभव मुथ्था, अमर गांधी, आनंद गुगळे, आनंद कटारिया, रूपेश मुथा, यश खिवंसरा, शुभम मुनोत, शुभम मुथा, धीरज चोरडीया, सिद्धार्थ कोठारी, जैन महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता बोरा, संगीत मंडळ अध्यक्ष ज्योती भन्साळी, सोनल कोठारी, कविता मेथा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत राजेंद्र बोरा यांनी, तर सूत्रसंचालन सुनेता बोरा यांनी केले. स्वप्नील भन्साळी यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)