नारायणगावात एड्‌स दिनानिमित्त जनजागृती रॅली

नारायणगाव- जागतिक एड्‌स दिन सप्ताहानिमित्त ग्रामीण रुग्णालय आणि शिवनेरी विद्यालय आर्वी यांच्या वतीने जनजागृती मोहिमेंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. या रॅलीला वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. सुरवसे आणि मुख्याध्यापक शेळके यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. रॅलीत जन जागृतीसाठी विविध उपाययोजनांचे फलक होते. ग्रामीण रुग्णालयातील समुपदेशक संदेश थोरात यांनी एड्‌स विषयी वस्तुस्थिती, गैरसमज, उपचार आणि प्रतिबंधक उपाय याविषयी मार्गदर्शन केले. या रॅलीत विद्यालयाचे शिक्षक गरकर गाडगे, पोंदे, तिटकारे,महाजन, आढाव, दाते, मांडे, शहा उपस्थित होते. सूत्रसंचालन पोंदे आणि आभार प्रयोगशाळा तंत्रज्ञ दत्तात्रय रोकडे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)