नारायणगावात अल्पवयीन मुलीचा अल्पवयीन मुलाकडून विनयभंग

नारायणगाव- अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देऊन विनयभंग करणाऱ्या अल्पवयीन (16 वर्षीय) मुलावर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद पीडित मुलीने नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली. यातील संशयित आरोपी फरार आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, वारूळवाडी-गुजांळवाडी रोडवर दि. 3 ऑगस्ट रोजी रा. प. सबनीस शाळेसमोर पीडितेचा संशयित आरोपी अल्पवयीन मुलाने पाठलाग केला तसेच तिला मनास लज्जा होईल असे वर्तन केले. तसेच त्यानंतर ही तो पीडितेला त्रास देत होता. त्यामुळे ही बाब पीडितेने पालकांना सांगितली. त्यानंतर याबाबत पीडितेने नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)