नारायणगावमध्ये रुरर्बन योजना राबविणार

नारायणगाव- केंद्र शासानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या रुरर्बन क्‍लस्टर विकास योजने अंतर्गत नारायणगाव क्‍लस्टरची निवड करून नारायणगाव आणि नारायणगाव परिसराच्या विकासासाठी लवकरच या योजनेची कार्यवाही केली जाईल, अशी घोषणा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.
ग्रामपंचायत नारायणगाव जिल्हा परिषद पुणे आणि ब्राम्हण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु होत असलेल्या गॅस शवदाहिनी बांधकामाचे आणि मुक्ताई समाज मंदिर सभामंडपाच्या भूमिपूजन समारंभ शनिवारी (दि.4) पार पडला. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने गॅस शवदाहिनीसाठी 76 लक्ष आणि मुक्ताई समज मंदिर सभामंडपासाठी 1.5 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती सरपंच योगेश बाबू पाटे आणि ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे यांनी दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके गुलाब पारखे, देवराम लांडे, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, जुन्नर सभापती ललीता चव्हाण, उपसभापती दिलीप डुंबर, मंगेश काकडे, आनंद रासकर, जुन्नर नगराध्य्क्ष शाम पांडे, शरद अण्णा चौधरी, बाळासाहेब पाटे, वासुदेव कानसकर, मंगेश अण्णा काकडे, तात्यासाहेब गुंजाळ, संभाजी तांबे, जुन्नर पंचायत समिती गटविकास अधिकारी सतीश गाढवे, पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर, रमेश खुडे, जीवन शिंदे, पंडित मेमाणे, ब्राम्हण संघटनेचे अध्यक्ष एकनाथ कुलकर्णी, नारायणगाव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सदस्या, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद तसेच समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
नारायणगावमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यापासून सरपंच योगेश पाटे आणि त्याच्या सहकार्ऱ्यांनी झपाटून विकासकामे केली आहेत. लोकांचा विश्वास मोठ्या प्रमाणावर संपादन करून विकासाचा ध्यास घेऊन ग्रामपंचायत कार्यरत झाली आहे. भविष्यात ग्रामपंचायतीसाठी सर्व सहकार्य करणार असल्याचे खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले आहे.
जिल्हा नियोजन समिती आणि महाराष्ट्र शासनाने या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. माझ्या समवेत वेळोवेळी ग्रामपंचायत नारायणगाव सातत्याने पाठपुरावा करीत गेली आहे. तसेच निधी उपलब्ध झाला असून यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी यांचे मोठे सहकार्य लाभले आहे, असे जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच योगेश पाटे यांनी केले. तर सूत्रसंचालन आशिष माळवदकर आणि शितल ठुसे यांनी केले. तर आभार हेमंत कोल्हे यांनी मानले.

  • मीना नदीवरील पुलासाठी प्रयत्नशील
    नारायणगाव आणि वारूळवाडी यांना जोडणारा मीना नदीवरील पुलासाठी प्रयत्न करून लवकरात लवकर मंजुरी आणणेसाठी पर्यंत केला जाईल, असे आश्‍वासन खासदार आढळराव पाटील यांनी दिले. पर्यटन क्षेत्र जुन्नर तालुक्‍याच्या विकासासाठी या पुलामुळे गती निर्माण होऊन नारायणगाव, वारूळवाडीच्या पश्‍चिम पट्याला जोडणाऱ्या बाह्यवळण पुलामुळे ओझर, लेण्याद्री, किल्ले शिवनेरी यांना राष्ट्रीय महामार्गाने जोडणारा पर्याय उपलब्ध होणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)