नारायणगावच्या उर्दू शाळेस ई-लर्निंग भेट

नारायणगाव-येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेस ई-लर्निंग स्मार्ट टीव्ही, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघास एल.ई.डी टीव्ही आणि पाबळ येथील गो-शाळेस चारा वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला, अशी माहिती विक्रांत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मुकेश वाजगे यांनी दिली. यावेळी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, सरपंच योगेश पाटे, डॉ. प्रशांत काचळे, सुफी गुरू लतीफ पटेल, हाजीरज्जक कुरेशी, संतोष खैरे, उपसरपंच संतोष दांगट, आशिष माळवदकर, वारूळवाडीचे उपसरपंच परशुरामवारुळे, राजश्री बोरकर, अंजली खैरे, अशोक गांधी, सुजित खैरे, सिताराम पाटे, सूरज वाजगे, जालिंदर पानसरे, संजय दिवटे, किरण वाजगे, गणेश वाजगे, मेहबुब काझी, सिद्दिक शेख आदी मान्यवर उपस्थित होते. विक्रांत नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी उपसरपंच संतोष वाजगे यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रांत क्रीडा मंडळ, विक्रांत नागरी पतसंस्था आणि रोटरी क्‍लब नारायणगाव यांच्या वतीने या समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. संतोष वाजगे हे निस्वार्थी आणि सेवाभावी व्यक्‍तिमत्व असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाने निश्‍चितच संस्था यशस्वीतेचे शिखर गाठेल असे गौरवोद्गार, आमदार शरद सोनवणे यांनी काढले. या कार्यक्रमासाठी सूरज वाजगे, मुकेश वाजगे, सागर दरंदाळे, निलेश गोरडे, मोहीत वाजगे, विघ्नहर वाजगे, हर्षल वाजगे, बाळा शिवले आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संस्थेचे सचिव सुनील वाव्हळ यांनी केले. तेजस वाजगे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)