नारळाचे भाव वधारले

मागणी वाढल्याचा परिणाम


सण-उत्सवामुळे पुढील तीन महिने नारळाचे भाव राहणार तेजीत


नव्या नारळाच्या भावात शेकड्यामागे 150 रुपयांनी, तर उर्वरित सर्व नारळाच्या भाव सुमारे 100 रुपयांनी वाढ

पुणे- हिंदु धर्मामध्ये विशेष महत्त्व असलेल्या नारळाला मागणी वाढली आहे. त्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने नारळाचे भाव तेजीत आहेत. त्यामुळे नव्या नारळाच्या भावात घाऊक बाजारात शेकड्यामागे 150 रुपयांनी, तर मद्रास, पालकोल आणि साफसोल या नारळांच्या भावात सुमारे 100 रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी दीपक बोरा यांनी दिली. आता श्रावण महिना सुरू होणार आहे. त्यामध्ये असणारे सण, त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र उत्सव असणार आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्याच्या कालावधीत नारळाचे भाव तेजीत राहण्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे.
मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज 8 ते 10 ट्रक नारळांची आवक होत आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून ही आवक होते. येथून पुणे शहर, जिल्हा, नगर आणि सातारा जिल्ह्यात नारळ जातो. आषाढ महिन्यात यात्रा, जत्रा जास्त असल्याने मागणी वाढली आहे. पुजे, तोरणासाठी नवा नारळ वापरला जातो. त्यामुळे या नारळाला मागणी आहे. नवा नारळ काढताना कवळा असतो. त्यामुळे काढल्यानंतर काही कालावधीच काळा पडतो. खराब होतो. मध्यंतरी मालवाहतुकदारांचा संप होता. त्यामुळे हे नारळ झाडावरून काढण्यात आले नाहीत. मालवाहतुकदारांच्या संपामुळे मध्यंतरीच्या कालावधीत नारळाची आवक अगदी नगण्य होत होती. आता त्यात सुधारणा होऊन आवक वाढली आहे. त्या तुलनेत मागणी अधिक असल्याने नव्या नारळाच्या भावात वाढ झाली आहे. तर कर्नाटाकातून मद्रास, साफसोल नारळची जास्त आवक होते. या नारळाचे खोबरे जाड असते. चव चांगली असते. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि ऑईल उद्योजकांकडून याला जास्त मागणी असते. एकंदरीतच मागणी वाढल्याने सर्वच प्रकारच्या नारळाच्या भावात वाढ झाली असल्याचे बोरा यांनी सांगितले.

नारळाचे प्रकार    -घाऊक बाजारातील शेकड्याचे भाव
मद्रास               – 2500-2700
पालकोल             -1500-1700
साफसोल              -1500-2200
नवा नारळ            -1400-1600


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)