नायलॉन मांजाचा वापर नकोच

नायलॉन चायना मांजाला बंदी
तरी त्याचा वापर का करता
बेपर्वाईने कायदे मोडून
अकाली उगाचच का मरता

दरवर्षी माना कापल्यामुळे
महाराष्ट्रात अनेक बळी गेले
गल्लोगल्ली गावगन्ना दादा
त्यांचीच री ओढतात काही चेले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पतंगबाजीचा मनसोक्त आनंद घ्या
माणसाच्या जीवाशी खेळ कशाला
नायलॉन मांजाचा वापर नकोच
ओरडून कोरड सर्वांच्या घशाला

धारदार काच अन्‌ मांजामुळे
निष्पाप पक्षीही बळी जातात
मनुष्य असो की प्राणी-पक्षी
सर्वांचा जीव आपल्याच हातात

हा मांजा विकणे अन्‌ वापरणे
करूच नये कुणी घातक पाप
पतंगबाजीच्या साऱ्या गदारोळात
बळी जाऊ शकतात कुणाचेही आईबाप

मकर संक्रांतीच्या पावन पर्वात
कुठेही अघटित नकोच घडायला
पतंग उंच आकाशात धाडतांना
कुणी इमारतीवरून नको पडायला

तीळगुळाची गोड मस्त चव
तीळमात्र व्हायला नको कमी
कायद्याच्या धाकाने नकोच
स्वतःहून सर्वांनी द्यावी हमी

पतंगावर नेते किंवा अभिनेते
छापून घेऊच नयेत कुणी
भंपकपणा अन्‌ उथळपणा
हद्दपार करावी ही प्रथा जुनी

विना अपघात विना गदारोळ
आपण मकर संक्रांत पार पाडू या
जे जे काही अनिष्ट विघातक
सारे मिळून एकमताने गाडू या
– विजय वहाडणेनायलॉन चायना मांजाला बंदी
तरी त्याचा वापर का करता
बेपर्वाईने कायदे मोडून
अकाली उगाचच का मरता

दरवर्षी माना कापल्यामुळे
महाराष्ट्रात अनेक बळी गेले
गल्लोगल्ली गावगन्ना दादा
त्यांचीच री ओढतात काही चेले

पतंगबाजीचा मनसोक्त आनंद घ्या
माणसाच्या जीवाशी खेळ कशाला
नायलॉन मांजाचा वापर नकोच
ओरडून कोरड सर्वांच्या घशाला

धारदार काच अन्‌ मांजामुळे
निष्पाप पक्षीही बळी जातात
मनुष्य असो की प्राणी-पक्षी
सर्वांचा जीव आपल्याच हातात

हा मांजा विकणे अन्‌ वापरणे
करूच नये कुणी घातक पाप
पतंगबाजीच्या साऱ्या गदारोळात
बळी जाऊ शकतात कुणाचेही आईबाप

मकर संक्रांतीच्या पावन पर्वात
कुठेही अघटित नकोच घडायला
पतंग उंच आकाशात धाडतांना
कुणी इमारतीवरून नको पडायला

तीळगुळाची गोड मस्त चव
तीळमात्र व्हायला नको कमी
कायद्याच्या धाकाने नकोच
स्वतःहून सर्वांनी द्यावी हमी

पतंगावर नेते किंवा अभिनेते
छापून घेऊच नयेत कुणी
भंपकपणा अन्‌ उथळपणा
हद्दपार करावी ही प्रथा जुनी

विना अपघात विना गदारोळ
आपण मकर संक्रांत पार पाडू या
जे जे काही अनिष्ट विघातक
सारे मिळून एकमताने गाडू या
                         – विजय वहाडणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)