नायर हॉस्पिटलः एमआरआय मिशिनने खेचून घेतल्याने तरुणाचा मृत्यू

मुंबई – एमआरआय मशिनमध्ये खेचले गेल्याने नायर हॉस्पिटलमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीमुळे या युवकाने प्राण गमावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. राजेश मारू असे या मृत मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश हा आपल्या बहिणीच्या सासूला बघायला हॉस्पिटलमध्ये गेला होता. पेशंटचा एमआरआय करण्यास सांगण्यात आला. यामुळे तो पेशंट आणि मेहुण्यासोबत एमआरआय रुमकडे निघाले. राजेश पुढे होता आणि त्याच्या हातात ऑक्‍सिजन सिलेंडर होता. एमआरआय सेंटरमध्ये कोणतीही धातूची वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नसते. ‘मशिन अजून बंद आहे तुम्ही आत जाऊ शकता’, असे वॉर्डबॉयने सांगितलं. मात्र, जेव्हा राजेश आत गेला तेव्हा मशिन सुरू होत्या. मशिनने सिलेंडर सोबत त्यालाही खेचून घेतलं. त्याला त्वरीत बाहेर काढण्यात आलं, मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)