नायर रुग्णालयातील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरला अटक

मुंबई : नायर रुग्णालयातील एमआरआय मशिनमध्ये अडकून झालेल्या तरुणाच्या  मृत्यूप्रकरणी डॉक्टर सिद्धांत शाह यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नायर रुग्णालयात एमआरआय मशिनमध्ये खेचलं गेल्यामुळे राजेश मारु या तरुणाचा मृत्यू झाला होता. यात रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे .

राजेश मारु असं या 32 वर्षीय युवकाचं नाव असून तो आपल्या बहिणीच्या सासूला भेटायला  नायर हॉस्पिटलमध्ये गेला होता. एमआरआय कक्षात हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी या तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉक्टर सिद्धांत शाह, वार्डबॉय विठ्ठल आणि महिला वॉर्ड अटेन्डंट सुनीता सुर्वे यांना पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान आमदार मंगलप्रभात लोढा यांनी रुग्णालयाच्या डीनच्या कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केलं. तर मृत राजेश मारुच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने 5 लाखांची मदत दिली जाईल अशी माहिती आमदार लोढा यांनी दिली.

-Ads-

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)