राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू निवडणूक प्रचारात एकाच व्यासपीठावर

हैदराबाद: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू प्रथमच तेलंगणातील निवडणूक प्रचारात एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. 28 व 29 नोव्हेंबरला होणाऱ्या प्रचार सभांमध्ये हे दोन्हीं नेते प्रथमच एकत्र दिसणार आहेत. तेलंगणात होणाऱ्या निवडणुकीत तेलगुदेसम पक्षाने कॉंग्रेस पक्षाशी युती केली आहे. या महाआघाडीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तेलंगणा जन समिती या पक्षांनाहीं सामाऊन घेण्यात आले आहे.

भाजपच्या विरोधात विरोधकांची महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न चंद्राबाबू नायडू यांनी अलिकडेच हाती घेतला असून याच संबंधात नायडू यांनी अलिकडेच राहुल गांधी यांची भेट घेतली होती. सोनिया गांधी यांच्या एकमेव सभेसाठीही अन्य पक्षांच्याल नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तेलंगणात 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)