नायडू यांच्यासाठी मोदींचा पवार, नितीश यांना फोन

नवी दिल्ली -उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील एनडीएचे उमेदवार एम.वेंकय्या नायडू यांना पाठिंबा देण्याचे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध पक्षांच्या नेत्यांना केले.

नायडू यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच मोदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, जेडीयूचे नेते शरद यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांच्याबरोबरच एन.चंद्राबाबू नायडू (आंध्रप्रदेश), के.चंद्रशेखर राव (तेलंगण) आणि पलानीस्वामी (तामीळनाडू) या मुख्यमंत्र्यांना फोन करून मोदींनी त्यांना नायडू यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

नायडू यांचा राजकीय अनुभव पाहता विविध पक्ष त्यांना उमेदवार म्हणून स्वीकारतील असा विश्‍वास मोदींना वाटत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय सुत्रांनी दिली. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी 5 ऑगस्टला मतदान होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)