नायडू-कुमारस्वामी यांच्यात राजकीय आघाडीबाबत चर्चा

अमरावती – आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार सत्तेवरून घालवण्यासाठी सर्वच प्रादेशिक पक्षांनी एकत्रित येऊन भक्कम आघाडी उडण्याच्या विषयावर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यात एकमत झाले आहे. याच संबंधात दोन्ही मुख्यमंत्र्यांची येथे चर्चा झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये सुमारे चाळीस मिनीटे ही चर्चा झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. प्रादेशिक पक्षांच्या आघाडीबाबत तपशील ठरवण्यासाठी पुन्हा सविस्तर बैठक घेण्याचेही या दोन्ही नेत्यांनी मान्य केले आहे. चंद्राबाबू नायडू हे भाजपप्रणित एनडीए आघाडीतून अलिकडेच बाहेर पडले आहेत.

केंद्र सरकारने आंध्र प्रदेश या नवीन राज्याच्या उभारणीला आर्थिक मदत करावी आणि या राज्याला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी बरेच आंदोलन केले पण त्याला मोदी सरकारने अजिबातच न्याय न दिल्याने त्यांनी या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे तर तिकडे कुमारस्वामी यांच्या पक्षाने कर्नाटकात कॉंग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. या दोन्ही नेत्यांनी आता प्रादेशिक पक्षांच्या आघाडीबाबत पुढाकार घेण्याचे ठरवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)