नायजेरियामध्ये 76 मुलींना बोको हरामने सोडले

शाळांमध्ये न पाठवण्याची पालकांना तंबी

अबुजा – बोको हराम या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या 76 मुलींची आज सुटका केली. नायजेरियाच्या ईशान्येकडील दापची गावातून फेब्रुवारी महिन्यात बोको हरामने 110 विद्यार्थिनींना शाळेमधून पळवून नेले होते. त्यापैकी 76 विद्यार्थिनींची आज सुटका होत असल्याचे सरकारने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. ज्या विद्यार्थिनींकडे कागदपत्रे होती, अशा 76 विद्यार्थिनींची सुटका होत आहे, असे माहिती प्रसारण मंत्री लाय मोहम्मद यांनी म्हटले आहे.

नायजेरिया सरकार आणि दहशतवादी संघटनांमध्ये झालेल्या चर्चेनंतर बुधवार सकाळपर्यंतर या मुली दापची गावामध्ये परत पोहोचल्या. सरकार आणि दहशतवाद्यांमधील काही मध्यस्थांनी गेल्या काही आठवड्यांपासून या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार काल पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास या मुलींची सुटका करण्यात आली. सुटका होणाऱ्या मुलींची संख्या आणखीन वाढण्याची शक्‍यता आहे. वेगवेगळ्या 9 वाहनांमधून या मुलींना आणले गेले आणि शाळेच्या बाहेर सोडण्यात आले, असे पालकांच्या गटप्रमुखाने सांगितले.

दरम्यान या मुलींना पुन्हा शाळेमध्ये पाठवण्यात येऊ नये, अशी तंबीही बोको हरामने दिली आहे. बोको हरामने नायजेरियाच्या ईशान्येकडील भागावर आपला ताबा मिळवला आहे. या दहशतवादी संघटनेच्यावतीने घातक कारवायांसाठी मुलांचे अपहरण केले जाते. या दहशतवादी संघटनेच्या घातपातांमध्ये 2009 पासून 20 हजार जण ठार झाले आहेत. तर 26 लाख जणांना विस्थापित व्हायला लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)