नायजेरियन व्यक्तीकडून 47 लाखांचा गंडा

फेसबुकवरील मैत्री : रिअल इस्टेटमध्ये पैसा गुंतवण्याच्या बहाण्याने केली फसवणूक

पुणे – फेसबुकवरील महिलेने रिअल इस्टेट व्यवसायात पैसा गुंतविण्याच्या आमिषाने शहरातील एका व्यावसायिकाची 47 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी एका नायजेरियन विद्यार्थ्यास सायबर सेल पथकाने उत्तरप्रदेशातील नोएडा येथून अटक केली. आरोपीने अमेरिकन महिलेच्या नावे खोटे फेसबुक प्रोफाईल तयार करून व्यावसायिकाशी मैत्री वाढवली होती.

उसेनु जोशुभा ओगागा ओघेने (रा. नोएडा, उत्तरप्रदेश, मूळ नायजेरिया) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात आयटी ऍक्‍टअंतर्गत स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हरनिश हिंमतलाल शहानपुरिया (रा. शंकरशेठ रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हरनिश शहापुरिया यांना तीन महिन्यापूर्वी फेसबुकवर अमेरिकेतील ऍलेशिया स्मिथ या महिलेने फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठविली. फिर्यादींनी फ्रेंड रिक्‍वेस्टचा स्वीकार केल्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून संवाद वाढत गेला. यानंतर आरोपीने विश्‍वास संपादन करून भारतीय रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची आहे, तुम्ही मला व्यवसायात भागीदार करून घ्या, असे आमिष दाखविले. त्यानंतर काही दिवसांनी मी दिल्ली एअरपोर्टवर आले आहे. मात्र, मला कस्टम विभागाने अडविले आहे, अशी बतावणी करीत फिर्यादींना वेगवेगळ्या बॅंक खात्यावर 47 लाख 7 हजार रुपये जमा करायला लावले. फिर्यादींनी पैसे जमा केले. त्यानंतर महिलेने फिर्यादींशी संपर्क साधणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

याप्रकरणाचा तपास सायबर सेल समांतरपणे करत होते. त्यांना तांत्रिंक विश्‍लेषण केल्यावर संशयित आरोपी हा उत्तरप्रदेशातील नोएडा येथे असल्याची माहिती मिळाली. सायबर सेल पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष बर्गे, उपनिरीक्षक किरण औटी, अलका जाधव, कर्मवारी बाबासो कराळे, सरिता वेताळ, नितेश शेलार, शिरीष गावडे, संतोष जाधव, ज्योती दिवाणे यांनी नोएडातील गौतम बुद्धनगर येथून आरोपी उसेनु ओघेने यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन लॅपटॉप आणि मोबाईल्स जप्त केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)