नायजेरियन विद्यार्थ्यांनी टॅक्‍सी ड्रायव्हरला मारहाण करून पळवली टॅक्‍सी

ग्रेटर नॉयडा (उत्तर प्रदेश)- चार नायजेरियन विद्यार्थ्यांनी एका टॅक्‍सी ड्रायव्हरला मारहाण करून त्याचे टॅक्‍सी पळवून नेल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

चार नायजेरियन विद्यार्थ्यांनी एक टॅक्‍सी बुक केली. नवी दिल्लीमधील अक्षरधाम येथे टॅक्‍सी आल्यानंतर ते चौघेजण टॅक्‍सीत बसले. काही अंतर दूर पोहचल्यानंतर त्यांनी टॅक्‍सी ड्रायव्हर अंकुश याला दमदाटी केली, आणि त्याला ग्रेटर नॉयडाकडे टॅक्‍सी नेण्यास भाग पाडले. ग्रेटर नॉयडा येथील रेयॉन स्कूलजवळ टॅक्‍सी येताच त्यांनी चौघांनी मिळून अंकुशला मारहाण करून टॅक्‍सीतून बाहेर फेकून दिले आणि त्याची टॅक्‍सी घेऊन पळून गेले,.

अंकुशने नंतर कास्ना पोलीस चौकीवर जाऊन आपली टॅक्‍सी पळवून नेल्याबाबतची तक्रार केली. चार नायजेरियन विद्यार्थ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असल्याची माहिती कास्ना पोलीस चौकीचे प्रमुख जितेंद्र कुमार यांनी दिली आहे. टॅक्‍सी ड्रायव्हर अंकुश हा मीरतमधील कंकनखेडा येथील रहिवासी असल्याची आणि पुढील तपास चालू असल्याचे जितेंद्र कुमार यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)