नायगाव येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात

नायगाव- नायगाव येथे विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गावात प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच दिपाली जगताप व भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले कैलास खेसे यांनी ध्वजारोहण केले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सोमनाथ शेंडगे, श्री सिद्धेश्वर विद्यालयात माजी सैनिक बाळासाहेब कड, चौंडकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सिद्धेश्वर सोसायटीचे संचालक चांगदेव चौंडकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी गावातील शिक्षक, जेष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)