नायगाव येथे माघ एकादशी उत्साहात

नायगाव- पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील नायगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी मंदिरात माघ एकादशीनिमित्त ह.भ.प. शिवाजी नामदेव चौंडकर यांचे कीर्तन झाले. यावेळी त्यांना गायन साथ भागवत मारकड, इंगुळकर महाराज, साळवी महाराज यांनी दिली. तर मृदुंग साथ अमर अक्षय खेसे, राहुल थोरात यांनी दिली. यावेळी सहकार महर्षी चंदुकाका जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त सासवड येथे आयोजित भजन स्पर्धेत श्री सिद्धेश्वर भजनी मंडळ नायगाव यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक व मृदंग, हार्मोनियम, विणा मिळाल्याबद्दल ह.भ.प. अक्षय खेसे, सदाशिव चौंडकर, संतोष चौंडकर, बाळासाहेब खेसे, संपत खेसे, सयाजी खेसे व इतर सभासद यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी ह.भ.प. शांताराम कड, जयराम खेसे, बापू बनकर, चंद्रकांत चौंडकर, दीपक जगताप आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)