नायगाव- पुरंदर तालुक्‍यातील नायगाव येथे महिलांनी नागपंचमीचा सण उत्साहात साजरा केला. शेतकऱ्यांचा मित्र आणि निसर्ग साखळीत महत्त्वाचा घटक असलेल्या नागांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून महिलांनी नागपंचमी साजरी केली. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार नागांचे पूजन करण्यास बंदी असल्याने महिलांनी नागाच्या प्रतिमेच्या पूजनावर भर दिला.
नागपंचमी हा श्रावणातील महत्त्वाचा सण मानला जातो. महिला या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी महिलांनी श्री शंकर आणि नागांचे पूजन केले. महिलांनी घरातच नागाच्या प्रतिमेचे तर काहींनी वारुळाचे पूजन केले. नागपंचमीच्या सणानिमित्त घरोघरी पुरणाचे दिंड करून देवाला नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी महिलांनी नायगाव येथील श्री सिद्धेश्वर व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)