नायगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

नायगाव- पुरंदरच्या तालुक्‍याच्या पूर्व भागातील श्री क्षेत्र नायगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. कार्तिक पौर्णिमा व गुरुनानक जयंतीनिमित्त सुट्टी असल्यामुळे हजारो भाविकांनी श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे पांडेश्वर येथून ग्रामस्थांनी आणलेल्या कऱ्हेच्या पाण्याने श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांना स्नान घालण्यात आले व अभिषेक करण्यात आला, अशी माहिती मनोज जगताप व राहुल कड यांनी दिली. अखंड हरिनाम सप्ताह सुरु असल्याने सकाळी 6.45 वाजता आरती करण्यात आली. त्यानंतर ह. भ. प. विनोदाचार्य सुधाकर महाराज वाघ (पैठण) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला. त्यांना मृदुंगाची साथ तेजेस खेसे, यशवंत भोसले यांनी दिली. गायन साथ अशोक भोसले, चांगण महाराज, संपत साळवी, आबा बोरकर यांनी दिली. भजन साथ नायगाव भजनी मंडळाने दिली. श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची आकर्षक महापुजा पुजारी दीपक जगताप यांनी केली. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी संभाजी वाळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश वाळके उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)