नायगाव परिसरात पाण्यासाठी नागरिकांची वणवण

नायगाव- नायगाव परिसरातील अनेक गावांतील लोकांना सध्या भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांतील नळयोजना बंद पडल्या आहेत. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. शासनाच्या अयोग्य नियोजनामुळे अनेक गावात धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्‍यातील नायगाव परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून टॅंकर चालू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी ही नागरिकांनी केली आहे. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक गावांना पाणी पुरवठा करणारी पारगाव-माळशिरस-कोळविहरे या प्रादेशिक योजनेचे वीजबील थकल्यामुळे दोन वर्षांपासून महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडीत केला आहे. अनेक गावांना पाणी पुरवठा करणारी पारगाव-माळशिरस-कोळविहरे ही प्रादेशिक योजना बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे.
पुरंदर तालुक्‍यातील नाझरे धरणावरील पारगाव-माळशिरस-कोळविहिरे प्रादेशिक या योजनेचा वीजपुरवठा थकबाकीमुळे महावितरण कंपनीने खंडीत केला आहे. त्यामुळे नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. योजना सुरू होणार की नाही याची चर्चा सध्या या योजनेचा लाभ मिळणाऱ्या गावातील नागरिकांमध्ये आहे. आमच्या पाण्याचा प्रश्न कोण सोडवणार या प्रतिक्षेत येथील नागरिक आहेत. त्यामुळे या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सध्या नाझरे धरणात पाणी उपलब्ध असून देखील या योजनेकडे सर्वांनी पाठ फिरवलेली दिसून येत आहे.

  • विजबील थकल्यामुळे योजना बंद
    लोकप्रतिनिधींनी नागरिकांचा अतिशय महत्वाचा असणारा पाण्याचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. सर्वच पक्षांनी व लोकप्रतिनिधीनी जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना व पुरंदर उपसा सिंचन योजनेचे योग्य नियोजन केले तर या योजनांच्या अंतर्गत येणाऱ्या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटेल. यासाठी शासन, लोकप्रतिनिधीनी त्वरीत उपाय योजना करणे गरजेचे आहे. पाणी उपलब्ध असून देखील केवळ महावितरण कंपनीचे विजबिल थकल्यामुळे ही योजना बंद आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)