नायगाव तहसीलदार सुरेखा नांदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

नांदेड- दुष्काळ निवारण निधी शासकीय अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन वसमतच्या तहसीलदार तथा विद्यमान नायगाव तहसीलदार सुरेखा नांदे व तत्कालीन तलाठी भास्कर खंदारे यांच्याविरुध्द शासकीय निधी अपहार केल्याप्रकरणी 156(3) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावेत असे आदेश वसमत न्यायालयाने दिले आहेत.

वसमत तालुक्यासाठी सन 2016-17 साठी दुष्काळ निवारण निधी म्हणून 2 लाख 83 हजार रुपये शासनाकडून मंजूर झाले होते. हा निधी त्या-त्या भागातील तलाठ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश शासनाचे असतांनाही तत्कालीन वसमतच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांनी आपल्या मर्जीतील कांही तलाठी व भास्कर खंदारे यांच्या खात्यावर सर्वाधिक निधी जमा केला. याबाबत शासकीय निधीत मोठा अफरातफर झाल्याची घटना उघडकीस आली आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अनेक तक्रारी झाल्या.

-Ads-

या तक्रारीची दखल न घेतल्याने विभागीय आयुक्तांकडे या प्रकरणाची तक्रार करण्यात आली. विभागीय आयुक्तांनी तत्कालीन तलाठी व विद्यमान हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात क्लर्क म्हणून असलेले भास्कर खंदारे यांची विभागीय आयुक्तांकडे कसुन चौकशी झाली असता खंदारे यांनी विभागीय आयुक्तांकडे तोंडी स्वरुपात खुलासा सादर करतांना माझ्या खात्यावर जमा झालेला निधी तहसीलदार नांदे यांना घरी नेऊन मी पैसे दिल्याचे कबुल केले. याप्रकरणावरुन विभागीय आयुक्तांनी तहसीलदार सुरेखा नांदे यांना सहा महिन्यासाठी सेवेतून निलंबित केले होते.

याचबरोबर यानंतर उपविभागीय अधिकारी यांनीही वाळूच्या रेतीतील दंड आकारणीच्या संदर्भात रजिस्टरवर खाडाखोड झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला. यानंतर अर्धापूर येथील माहिती अधिकारी कार्यकर्ता शेख जाकेर यांनी न्यायालयात धाव घेऊन शासकीय अपहार केल्याप्रकरणी तहसीलदार सुरेखा नांदे व भास्कर खंदारे यांच्या विरुध्द फसवणूकीचा गुन्हा व शासकीय निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी याचिका ऍड. इदरिस कादरी यांच्या मार्फत वसमत न्यायालयात टाकली. वसमत न्यायालयाने यात सुनावनी देत नायगावच्या विद्यमान तहसीलदार सुरेखा नांदे व हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागातील लिपीक भास्कर खंदारे  यांच्याविरुध्द 156(3) प्रमाणे वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश दिले आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)