नायगावात शुद्ध पाण्याची सोय

नायगाव- पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील नायगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले शुद्ध फिल्टर पाणी सर्वसामान्य जनतेला मिळावे यासाठी आरो प्लांट नुकतेच बसविण्यात आले आहे. शासनाने 14 व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला वर्ग केल्याने व तो निधी सार्वजनिक विकास कामासाठी खर्च करावयाचा यांचा पूर्ण अधिकार ग्रामसभेला दिला आहे. त्याद्वारे ग्रामपंचायतीच्या वतीने आरोप्लांट बसविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. अनेक ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत पाणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी फिल्टर आरोप्लांट बसवण्यास अनेक ग्रामपंचायतीने प्राधान्यक्रम दिले आहे. खाजगी शुद्ध पिण्याचा 20 लीटरचा जार 30 रूपयाला मिळतो. तर हाच जार उन्हाळ्यात 50 रुपयाला घ्यावा लागतो. मात्र, ग्रामपंचायतीच्या आरो प्लांटमुळे हाच 30 रूपयाचा जार केवळ 5 रूपयात मिळणार आहे. ग्रामस्थांना कमी दरात शुद्ध फिल्टर पाणी मिळत आहे. त्यामुळे ग्रामपंचायती सध्या गावात आरो प्लांट उभारण्यास प्राधान्य देत आहेत. अनेक गाव सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेत सहभागी आहेत. मात्र, पाणीपुरवठा करणाऱ्या योजना व्यवस्थित सुरू राहत नसल्याने वीज बिला अभावी व इतर अनेक कारणास्तव वारंवार बंद होत आहेत. आरो प्लांटमुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळत आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी गाव स्वयंपूर्ण होत आहे. नायगाव ग्रामपंचायतच्या वतीने आरो प्लांटचे नुकतेच उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)