नायगावात कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

नायगाव -शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी हाती घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुरंदरच्या पूर्व भागातील श्री सिद्धेश्वर सहकारी विकास सोसायटी नायगाव यांच्या वतीने नायगाव (ता. पुरंदर) येथे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी आवश्‍यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज भरुन देण्याचे आवाहन सोसायटीच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. यावेळी मारुती पाटोळे, प्रदीप खेसे, गिरीधर चौंडकर, अनिल शेंडगे, भानुदास चौंडकर, माणिक खेसे व महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)