नामस्मरणाद्वारे आत्मिक शांती मिळते -दौंडकर

चिंबळी- आजच्या धकाधकीच्या जीवनात मनाला शांती मिळावी यासाठी तरूण पिढितील नागरिकांनी दररोज दहा मिनिटे वेळ काढून पांडुरंगाचे नामस्मरण करणे गरजेचे आहे. तरूणांनी मनापासून पांडुरंगाचे केलेल्या नामस्मरणाचे आत्मिक शांती बरोबरच इच्छा शक्‍तीही वाढते, असे मत शिवचरित्र व्याख्याते हभप ज्ञानेश्‍वर महाराज दौंडकर यांनी केले. मुऱ्हे (कुरूळी, ता. खेड) येथील श्री विठ्ठल रूख्मणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण वर्धापन दिन व रामनवमीनिमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह तसेच सामुदायिक ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याची सांगाता झाली. तर रामनवमीनिमित्त झालेल्य किर्तनसेवेत दौंडकर बोलत होते. त्याचप्रमाणे रामनवमीनिमित्त केळगाव, चिंबळी, मोई, निघोजे आदि गावांमध्ये काकड आरती, महापूजा व संगीत भजन आदी धार्मिक कार्यक्रमाद्वारे राम जन्मोत्स्व साजरा झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)