नाभिक समाज हा स्वच्छतादूत : शंकर दळवी

नाभिक समाजाचा वडूजमध्ये मेळावा

वडूज –
 नाभिक समाजाचे हात नेहमी स्वच्छतेसाठी पुढे येत असतात. त्यांना दहा लाख बिनव्याजी कर्ज सरकारने द्यावे, त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून लढा दिला जाईल, नाभिक हा स्वच्छता दूत असल्याचे मत महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष भाऊ दळवी यांनी व्यक्त केले.

महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या नाभिक समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष शंकर भाऊ दळवी, उपाध्यक्ष बापूराव काशीद, पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष मरदाने, उपाध्यक्ष भानुदास वास्के, सेक्रेटरी अविनाश भादिर्गे, जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ, तालुकाध्यक्ष गिरीधर यादव, प्रदीप काळे, रामभाऊ यादव, अंबादास दळवी, अजित काशिद, चंद्रकांत जगताप, सुरेश पवार, किशोर काशिद, पांडुरंग राऊत, प्रा. एम. के. क्षीरसागर, आकाश यादव, जालिंदर काळे आदी प्रमुख उपस्थितीत होते.

-Ads-

दळवी म्हणाले, समाजातील दीनदलितांची सेवा करा. यामुळे निश्‍चितच सेवेच्या माध्यमातून आपणाला चांगले फळ मिळेल. सेवा करताना प्रामाणिकपणाचे कष्ट महत्वाचे आहेत आणि या गोष्टीचा मार्गक्रम करून जीवन जगले तर निश्‍चितच तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. विजय सपकाळ यांचे भाषण झाले. खटाव तालुक्‍यातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

यामध्ये तालुकाध्यक्षपदी गिरीधर यादव, उपाध्यक्ष कैलास काशिद, कार्याध्यक्ष हणमंत देवकर, शहराध्यक्ष शांताराम चव्हाण, उपाध्यक्ष अशोक यादव, खजिनदार विवेक यादव आदी पदांच्या निवडी करण्यात आल्या. अविनाश भांदिर्गे, विजय सपकाळ, भानुदास वास्के यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास प्रदीप काळे, संजय यादव, अशोक यादव, स्वप्नील यादव, गणेश यादव, ओंकार यादव यांच्यासह पुसेगाव, औंध, कातरखटाव व तालुक्‍यातील समाज बांधव उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)