नाभिक समाजाचा इतरांनी आदर्श घ्यावा

  • आमदार राहूल कुल : दौंड येथे नाभिक समाज जनगणना पुस्तिकेचे प्रकाशन

यवत – नाभिक समाजाने समाज जोडण्याचे संघटितपणे काम केले आहे. दीर्घकालीन समाज एकत्र करण्याचे काम करीत राहील, याची मला खात्री आहे. प्रत्येक समाजात कुरबुरी असतात. परंतु या समाजात कुरबुरी पहावयास मिळत नाहीत. इतर समाजाने संघटीत होण्याची आवश्‍यकता आहे. या नाभिक समाजाच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण झाले आहे. तालुक्‍यात नाभिक समाजाने जनगणना पुस्तिका निर्माण केली असून इतर समाजाने या नाभिक समाजाचा आदर्श घेऊन काम करावे अशी आशा आहे. पुढील काळात नाभिक समाजाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार असल्याचे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी प्रतिपादन केले. शनिवारी (दि.12) रोजी दौंड तालुका नाभिक समाज जनगणना पुस्तिका आणि नाभिक पुराण ग्रंथ प्रकाशन सोहळा व मेळाव्याच्याचे आयोजन केले होते. हा कार्यक्रमात दौंड तालुक्‍यातील चौफुला येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात झाला यावेळी ते बोलत होते.

यावेळी दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकचे अध्यक्ष रमेश थोरात, दौंड पंचायत समितीच्या सभापती मीना धायगुडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशाली आबणे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे, सयाजी ताकवणे, नियोजन मंडळाचे सदस्य नामदेव ताकवणे, भाजपचे दौंड तालुकाध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे, तानाजी दिवेकर, नाभिक समाजाचे प्रदेशाध्यक्ष कुंडलिक केळझरकर, पुणे जिल्हाध्यक्ष अंकुश खडके, दौंड तालुकाध्यक्ष गणेश साळुंखे, महिला अध्यक्षा अश्विनी बंड, सुभाष जाधव, सुभाष पंडीत, भारत जाधव, अपर्णा पंडीत, बेबीताई कण्हेरकर यांच्यासह आदी मान्यवर व नाभिक समाजातील बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात बोलताना म्हणाले, सर्वात सामाजिक व्यवस्थेत नाभिक समाज हुशार आहे. समाजाची सेवा करण्याचे व्रत या समाजाने घेतले आहे. या समाजाने आजचा घेतलेला मेळावा हा कौतुकास्पद आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष गणेश साळुंखे यांनी केले तर सूत्रसंचालन सलीम सय्यद यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)