नाबार्डच्या नव नियुक्त अधिकाऱ्यांची जिल्हा माहिती कार्यालयास भेट 

सातारा  – मुंबई येथील राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड) नव नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयास भेट देवून जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांना आपला जिल्हा सातारा व लोकराज्य अंक देऊन त्यांचे स्वागत केले. हर्ष देशमुख, प्रदिप राम, दिपककुमार आर, सेंथीलवन बालसुब्रम्हण्यम हे नव नियुक्त अधिकारी होते. त्यांच्या समवेत नाबार्डचे सुबोध अभ्यंकर होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या कार्यप्रणाली विषयी माहिती दिली. त्यांनी यावेळी सांगितले जिल्हा माहिती कार्यालय हे शासन विविध कल्याणकारी योजना राबविते. या योजनांची प्रचार व प्रसिद्धीचे काम जिल्हा माहिती कार्यालयामार्फत करण्यात येते.

जिल्हा माहिती कार्यालयाकडून शासकीय जाहिरात धोरणानुसार वृत्तपत्रांना जाहिराती दिल्या जातात. शासकीय योजना तसेच मंत्री महोदय व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमांचे व बैठकांचे चित्रीकरण तसेच वृत्तांकन करुन चित्रीकरण वृत्त वाहिन्यांना वृत्त वृत्तपत्रांना ई-मेलद्वारे दिले जातात.

महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिक हे माहिती व जनसंपर्क विभागाकडून दरमहा प्रकाशित केले जाते. त्यात शासन निर्णय, मंत्रिमंडळ निर्णय; तसेच शासन राबवित असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती प्रसिध्द करण्यात येते. नामवंत लेखकांच्या अभ्यासपूर्ण लेखांचाही समावेश असतो. सुंदर, आकर्षक आणि माहितीचा खजिना असलेले लोकराज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी आदी सर्वांसाठीच उपयुक्त आहेत, असेही जिल्हा माहिती अधिकारी यवुराज पाटील यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)