महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला की अनेक पालक व विद्यार्थ्यांना स्वर्ग गाठल्याचा आनंद होत असतो. प्रवेश न मिळणाऱ्यांना “क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ती’ अशा थाटाचे दुःख होते! याचे कारण म्हणजे प्रवेशासाठी असणारी अधिक गुणांची अट. गुणांचे हे दडपण विद्यार्थ्यांच्या मनावर खूप असते. त्यामुळेच कमी गुण मिळाल्यामुळे किंवा नापास झाल्यामुळे अनेक जण आत्महत्येला कवटाळतात.

मागील काळात महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्यांनी मोठे आव्हान उभे केले होते. त्यातूनच श्रेणीपद्धत सुरू झाली. तसेच शिक्षण हक्‍क कायद्यामध्ये तरतूद करून पहिली ते आठवीपर्यंत अनुत्तीर्ण न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आठवीनंतर पुन्हा पास-नापासचे चक्र सुरू होते. अनेकांना दहावीला नापास होण्याचे दडपण असते. त्यातूनही अनेक आत्महत्या घडतात. अशा वेळी एखादे महाविद्यालय केवळ नापासांनाच प्रवेश देते म्हटल्यावर अनेकांना आश्‍चर्य वाटू शकेल. अमेरिकेत असेच एक महाविद्यालय आहे.

या स्मिथ कॉलेजने मॅसाच्युसेटस्‌ युनिव्हर्सिटीच्या सहयोगाने असा उपक्रम चालवला आहे. या महाविद्यालयात एक विशेष अभ्यासक्रम आहे. तो केवळ अपयशी विद्यार्थ्यांसाठीच असतो. त्याला “फेलिंग वेल’ असे नाव देण्यात आले आहे. जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होऊन आपल्या भविष्याबाबत चिंतीत आहेत त्यांच्या मदतीसाठी हा अभ्यासक्रम आहे. विशेष म्हणजे केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर कुठेही अपयश आलेल्यांनाही येथे प्रवेश मिळतो. अपयशाचा सामना कसा करावा आणि जीवनात पुढे कसे जावे, याचे धडे येथे दिले जातात. अर्थात या कॉलेजमधील विचित्र कोर्समुळे हे कॉलेजही टीकेचे लक्ष्य बनले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)