नान्नजमध्ये प्रथमच महिला ग्रामसभा

नान्नज – जामखेड तालुक्‍यातील नान्नजमध्ये प्रथमच महिला ग्रामसभा घेण्यात आली. सरपंच डॉ. विद्या मोहळकर व ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे यांच्या माध्यमातून महिला सबलीकरण व संघटनांची जाणीव करून देत महिलांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विविध योजना, महिला सबलीकरण, अंगणवाडी पोषण आहार, शौचालयाचे महत्त्व व आरोग्य आदी विषयांवर चर्चा करून माहिती देण्यात आली.

14 वित्त आयोग संदर्भातील कामे, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, गाव 100 टक्‍के हागणदारी मुक्‍त, अंगणवाडीसेविकांची कामे, आरोग्यसेविकांची कामे या संदर्भात आढावा घेण्यात आला. गावातील बचत गट, व्यवसायासाठी शॉपिंग सेंटर उभारणी, जन्म मुत्यू नोंदणी, स्त्रीभ्रूणहत्या, गर्भलिंग निदान न करणे, पाणी पुरवठा महत्त्व व व्यवस्थापन, ग्रामपंचायत थकबाकी व कर भरणा, कुपोषण व त्यावरील उपाय, घरातील सांडपाणी व कचरा व्यवस्थापन, गावातील दारूबंदी या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)