नाना पेठेत दहशत माजविणाऱ्याला पोलीस कोठडी

पुणे – कोयता दाखवून दहशत माजविल्याप्रकरणी पोलिसांनी नाना पेठेतील सराईत गुन्हेगारास अटक केली. त्याला 21 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. सुशांत ऊर्फ मट्या शशीकांत कुचेकर (वय 28, रा. राजेवाडी झोपडपट्टी, नानापेठ) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे.

या प्रकरणी सुशांत प्रकाश मोरे (वय 22, रा. नानापेठ, पत्र्याची चाळ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 24 एप्रिल रोजी रात्री अकराच्या सुमारास न्यू नाना पेठेतील सार्वजनिक रस्त्यावर घडली होती. फिर्यादी त्याचा मित्र शुभम कांबळे याच्या समवेत गप्पा मारत होता. त्यावळी आरोपी कुचेकर आणि आशितोष दीपक सोनवणे (वय 19, रा. राजेवाडी झोपडपट्टी) दुचाकीवरुन तेथे आले. त्यांनी फिर्यादीला कोयता दाखवत पसरविण्याता प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)