नाना पाटेकर यांना मल्हाररत्न पुरस्कार जाहीर

जेजुरी, दि. 14 (वार्ताहर) – महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री. मार्तंड देवसंस्थान समितीच्या वतीने प्रदान करण्यात येणारा मल्हाररत्न पुरस्कार जेष्ठ नाट्य-सिनेकलावंत नाना पाटेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. जेजुरी येथ 18 जानेवारीला देवसंस्थानच्या वतीने सर्वधर्मीय बिगरहुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते पाटेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
बहुजन बांधवांचा लोकदेव असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या देवसंस्थान समितीकडून राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य असलेल्या व्यक्तींना मल्हाररत्न पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यापूर्वी जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे, धार्मिक क्षेत्रातील नारायण महाराज तसेच जेष्ठ शरद पवार आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मराठी कलावंत म्हणून नाना पाटेकर यांची नाट्य कलाक्षेत्रात खडतर परिश्रम व तपश्‍चर्या आहे. तसेच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून नाम फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील विशेषतः आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी मोठी मदत आणि योगदान नाना पाटेकरांचे आहे तर जेजुरीनगरी आणि त्यांचे जुने ऋणानुबंध आहेत. यामुळे यंदाचा पुरस्कार त्यांना देण्याचे देवसंस्थानच्या वतीने ठरविण्यात आल्याचे प्रमुख विश्वस्त राजकुमार लोढा यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)