नाना काटे सोशल फाउंडेशन तर्फे 12 हजार गणेश मूर्तीचे संकलन

पिंपळे-सौदागर – पवना नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी नाना काटे सोशल फाउंडेशनने या वर्षीही 12 ते 13 हजार मूर्तींचे संकलन केले. दोन वर्षांपासून हा उपक्रम पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील महादेव मंदिर घाटावर राबवण्यात येत आहे. घरगुती व गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती नदीमध्ये विसर्जित न करता दान करण्याच्या नगरसेवक नाना काटे यांच्या आवाहनास गणेशभक्‍तांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. रहाटणी, पिंपळे-सौदागर व पिंपरी येथील 12 हजार 300 मूर्ती दान केल्या. मागील वर्षी साडेतीन हजारांहून अधिक गणेश मूर्ती दान केल्या होत्या. त्या श्री फाउंडेशन, पुणे यांना दिल्या. त्यांची रंगरंगोटी करून विक्री करण्यात आली. त्यातून 3 ते 4 लाख रुपये मिळाले. ते अनाथ आश्रमातील मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी वापरण्यात आले. यावर्षीही तसाच उपक्रम फाउंडेशन राबवणार आहे. नगरसेवक नाना काटे स्वतः विसर्जन घाटावर उपस्थित राहून नागरिकांना मूर्ती दान करण्याचे आणि निर्माल्य कलशात टाकण्याचे आवाहन करीत होते. नाना काटे सोशल फाउंडेशन, विविध संस्था, एमकेअर फार्मा कंपनी, रोटरी क्‍लबने या उपक्रमात सहयोग दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)