नानासाहेब शिंदे आदर्श शिक्षक पुरस्कार

नातेपुते- मोरोची (ता. माळशिरस) मधील साळुंखे वस्ती येथील जिल्हा परिषद शिक्षक नानासाहेब शिंदे यांना शिक्षण विभाग पंचायत समिती माळशिरस तालुका स्तर आदर्श शिक्षक पुरस्कार 2018-19 मिळाला आहे. नानासाहेब शिंदे यांनी शिक्षण क्षेत्रात बजाविलेल्या निष्ठापूर्ण सेवेबद्दल त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नानासाहेब शिंदे हे कारूंडे गावचे रहिवासी आहेत. यावेळी मदनसिंह मोहिते पाटील, वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, किशोर सूळ पाटील, अर्जूनसिंह मोहिते पाटील यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)