नादुरुस्त एसटीचा प्रवाशांना त्रास

एसटीचा प्रवास नको रे बाबा ः बस बंद पडल्याने होतोयश मनस्ताप

कुरकुंभ-येथील परिसरात एसटी बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लांब पल्ल्याच्या या बस वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप होत असून लांबच्या प्रवासासाठी चांगल्या बसचा वापर करावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. पुणे-सोलापूर या महामार्गावर रोज अनेक बस ये-जा करीत असतात; मात्र मागील काही आठवड्यात कुरकुंभ या ठिकाणी सोलापूरच्या बाजूने पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या चार ते पाच वेळा बंद पडल्याने संबंधित प्रवाशांना पुण्याकडे प्रवास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. लांब पल्ल्याचे प्रवासी आरक्षण करूनच जातात. आपला प्रवास आरामदायी झाला पाहिजे, ही भावना त्यामागे असते; मात्र एसटी बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. जुन्या एसटी बसची झालेली दयनीय अवस्था, त्यामध्ये खिडक्‍यांना काचा नसणे, आतील आसनव्यवस्थाची दुरवस्था पत्रे उचकटलेले यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. एसटी गाड्या रस्त्यातच बंद पडून एक प्रकारे एसटी महामंडळाची बदनामी, पर्यायाने प्रवाशांचे हाल होता याकडे मात्र एसटीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. एसटी बंद पडल्याने प्रवाशांना रस्त्यातच उतरून दुसरी गाडी शोधत घरी जावे लागल्याने नाहक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने एसटी सेवेकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)