“नादरूप’च्या वर्धापन दिनानिमत्त “चतुरंग की चौपाल’

पुणे  – सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना शमा भाटे यांच्या “नादरूप’ या कथक संस्थेच्या 30 व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 2 सप्टेबर पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात सायंकाळी 7 वाजता “चतुरंग की चौपाल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली येथील कथक केंद्राच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षा कमलिनी अस्थाना आणि सदस्या नलिनी अस्थाना या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य असणार आहे.
प्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्या शिष्या शमा भाटे यांची नादरूप ही कथक संस्थ यावर्षी आपली 30 वर्षे पूर्ण करीत आहे. यानिमित्ताने संस्थेच्या वतीने “चतुरंग की चौपाल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चतुरंग हा अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातील एक जुना आणि महत्त्वाचा भाग असून यामध्ये तराना, सरगम, साहित्य आणि नृत्याचे बोल यांचा समावेश असतो. “चतुरंग की चौपाल’ या कार्यक्रमात नावाप्रमाणेच चार चतुरंगांचे सादरीकरण होणार आहे. ज्यामध्ये यमन, जयजयवंती, अडाणा आणि भैरवी या रागांचा समावेश असेल. या प्रत्येक चतुरंगाचा आपला असा वेगळा बाज आहे आणि या सादरीकरणात या चार चतुरंगांचे “चौपाल’ सादर होणार आहेत.
हे सादरीकरण हे स्वत: नादरुप प्रोडक्‍शनचे असून यामध्ये पं. जितेंद्र अभिषेकी, पं. राजन – साजन मिश्रा, पं. सुरेश तळवलकर, पं. व्ही. डी. पलुसकर यांच्या बंदिशींचा समावेश असून त्यावर नृत्याचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी केदार पंडित यांनी संगीत दिले असून शमा भाटे यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. केतकी शाह, अमीरा पाटणकर, रागिणी नागर, अवनी गद्रे, शिवानी करमरकर या प्रमुख नृत्यांगना या कार्यक्रमात सादरीकरण करणार असून विनय रामदासन, नागेश अडगांवकर, जयदीप वैद्य, सुरंजन खंडाळकर (गायन), चारुदत्त फडके, निलेश रणदिवे, अजिंक्‍य जोशी (तबला), सुखद मुंडे (पखावज), रविंद्र चारी (सतार), संदीप कुलकर्णी (बासरी), अभिषेक बोरकर (सरोद) हे साथसंगत करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)