नाथू ला मार्ग कैलास मानसरोवर यात्रेसाठी पुन्हा खुला

नवी दिल्ली – नाथू ला मार्ग कैलास मानसरोवर यात्रेसाठी पुन्हा एकदा खुला होणार आहे. सिक्किममधील नाथू ला मार्गाने कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात सहमती झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे. सुमारे दहा महिन्यांनंतर नाथू ला मार्गाने कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. डोकलाम विवादानंतर यात्रेकरूंसाठी नाथू ला मार्ग चीनने बंद केला होता. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर नाथू ला मार्गाबाबत सहमती झाल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले.

या वर्षी नाथू ला मार्गाने कैलास मानसरोवर यात्रा सुरू होत आहे या गोष्टीचा आम्हाला आनंद होत असल्याचे वांग यी आणि सुषमा स्वराज यांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे.उत्तराखंडमधील लिपुलेख खिंड आणि सिक्किममधील नाथू ला खिंड अशा दोन मार्गांवरून भारत सरकार जून ते सप्टेंबर या काळात कैलास ज्म्मानसरोवर यात्रेचे आयोजन करत असते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)