नाथभक्तांच्या वाटेवर अतिक्रमणांचा अडसर

म्हसवड येथील परिस्थिती : रथोत्सव दोन दिवसांवर आला असतानाही अतिक्रमणे “जैसे थे’

म्हसवड – म्हसवड येथील सिध्दनाथ यात्रा रथोत्सवास अवघा एकच दिवस असूनही जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी नगरपालिकेने रस्त्यावरील अतिक्रमणे काढली नाहीत. तसेच सातारा-पंढरपूर मार्गाचे काम म्हसवड हद्दीत अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याने उखडलेला रस्ता, मोठमोठे खड्डे व धुळ यांचा सामना करत भाविकांना यावे लागत आहे. यावर्षी नाथ भक्तांची वाट बिकट” झाली असून दोन्ही अधिकाऱ्यांच्या आदेशाला डावल्याचे काम करणाऱ्या खाते प्रमुखावर कारवाई जिल्हाधिकारी करणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

म्हसवड पालिकेच्या मालकीच्या जागेवर व सेवारस्त्यावर साठ ते सत्तर हातगाडे, पावभाजी, वडापाव, पानटपरी, चहाचे गाडे, चायनीस व भेळ पाणीपुरीची दुकाने आहेत. यामुळे अनेकवेळा वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार होत आहेत. यामुळे चालकांत मारामारीचे प्रकार घडत आहेत. त्याचप्रमाणे रस्ते स्वच्छ झाले, मात्र ठिकठिकाणी रस्त्यावर बांधकामाचे साहित्य पडल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना या साहित्यावरुन या लागत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, दहिवडी यांनी यात्रा कमेटीच्या बैठकीत साईड पट्ट्या दुरुस्ती करुन रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचा शब्द जिल्हाधिकारी यांना दिला होता. मात्र, शिंगणापूर रस्ता म्हसवड हद्दीतील साईड पट्टी जैसे थे आहे. यात्रेपूर्वी एका दिवसात हे काम काम पूर्ण करणार, असा सवाल नागरीक करत आहेत.

सातारा-लातूर रस्त्याचे काम गेले दीड वर्षे सुरू आहे. म्हसवड हद्दीत काम अत्यंत धिम्या गतीने सुरु असल्याने उखडलेला रस्ता, मोठ मोठे खड्डे, चढउतार व धुळ यामुळे सिद्धनाथाची वाट बिकट झाली आहे.

सातारा लातूर रस्त्याच्या ठेकेदाराने केली आहे गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी त्या अधिकार्याना सांगूनही कसलेच काम केले नाही. यात्रा नियोजन बैठकीत पोपटपंची करणाऱ्या व कागदोपत्री काम केल्याचे दाखवणाऱ्या त्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कारवाई करणार का असा सवाल म्हसवडकर करत आहेत.
वीज वितरण कंपनीने गेल्या चार दिवसांपासून म्हसवडकराची झोपच उडवली असून सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहापर्यंत दुरुस्तीच्या कारणाने वेळा लाईट ट्रिप होत आहे. बाजारचा दिवस असताना लाईट गुल होत होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)